Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू

by Divya Jalgaon Team
February 10, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । चिंचोली शिवारातील राधाकृष्ण लॉन्सजवळ विद्युत लाईनचे काम करीत असताना पोलचे ट्रॅक्टर पलटी होऊन उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या विद्युत नेरी रस्त्यावर वाहिनीच्या शेजारीच नवीन विद्युत लाईन उभारली जात आहे. चिंचोली शिवारात राधाकृष्ण लॉन्सजवळ हे काम सुरु आहे. या कामावर मोंढाळा, ता.भुसावळ येथील कामगार रोज कामाला येत आहेत. बुधवारी दुपारी मुख्य वाहिनीच्या शेजारीच ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोल उभे केले जात होते, त्यावेळी ट्रॅक्टर पलटी झाल्याने पोलचा मुख्य वाहिनीच्या तारांना स्पर्श झाला. पोलला हातात धरलेल्या विशाल नुकूल गायकवाड (वय १८,रा.मोंढाळा, ता.भुसावळ) यालाजोरदार विजेचा धक्का बसला तर त्याच्याच शेजारी असलेले ईश्वर एकनाथ शेळके (३५), अक्षय वसंत घ्यार (२२) हे लांब फेकले गेले. विशाल याचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय व ईश्वर हे जखमी झाले. दोघांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर इतर कामगारांनी कंत्राटदार सुपडू पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली,

परंतु त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने सर्व कामगारांनी संताप व्यक्त केला. वसंत घ्यार हे कामावर सुपरवायझर होते. दरम्यान, काम सुरु असताना मुख्य वाहिनीचा विज पुरवठा खंडीत करायला हवा होता, तो सुरु ठेवणेच तरुणाच्या जीवावर बेतल्याचा आरोप कामगारांनी केला.

Share post
Tags: #Chincholi#Electric ShockcrimeJalgaonMarathi Newsविजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू
Previous Post

जळगावातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व परिसर सॅनिटाईज

Next Post

ईच्छादेवी पोलीस चौकीच्या शेजारी गुटखा पकडला

Next Post
ईच्छादेवी पोलीस चौकीच्या शेजारी गुटखा पकडला

ईच्छादेवी पोलीस चौकीच्या शेजारी गुटखा पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group