जळगाव प्रतिनिधी । शहरातील एसएमआयटी कॉलेज परिसरातील राहणाऱ्या कुटुंबीय बाहेरगावी गेलेले पाहून चोरटे घरात शिरून 18 हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसएमआयटी कॉलेज परिसरात राहणारे बेबीबाई अविनाश पाटील (वय ४०) यांच्या घरी चोरी झाली आहे. बेबीबाई ह्या लहान बहिण, आई यांच्या सोबत राहतात. ७ रोजी सर्व कुटुंबीय मालमत्तेच्या कामासाठी धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे गेले होते. याच रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून सोन्याचे कानातले टॉप, रिंग, पेंडल, सोन्याची नथ असा १८ हजार ४०० रुपयांचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार शेजारचांच्या लक्षा आला. त्यानुसार बेबीबाई यांनी शहर पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


