यावल (रविंद्र आढाळे) – येथील एसटी आगारातुन रात्रीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या भुसावल कडुन यावल येण्यासाठी बसेस नसल्याने प्रवासांना अनेक अडचणी सामोरे जावे लागत असुन , यावलचे आगार प्रमुखांना विविध सामाजीक संस्थानी आणी राजकीय पक्षांनी निवेदन देवुन देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.
मागील सहा ते सात महीन्यांपासुन जगासह संपुर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणुसंसर्गाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे शासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन खबरदारीचा उपाय म्हणुन संपुर्ण राज्यातील एसटी बस सेवा पुर्ण बंद करण्यात आल्या होत्या.
दरम्यान मागील काही दिवसापासुन कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेले लॉकडाउनचा कार्यकाळ संपले असुन आता अनलॉकची प्रक्रीयाची अमलबजावणी सुरू झाली असुन, यावल आगारातुन काही प्रमाणात विविध ठीकाणाच्या बससेवा सुरू केल्या असुन यातील यावल ते भुसावळ ही एसटी बस सेवा रात्री ८ते १० वाजेच्या दरम्यान बंद असल्याने रात्री रेल्वे व्दारे बाहेरगावाहुन भुसावळ हुन यावल येथे येणाऱ्या प्रवासी त्यात महीला व लहान मुलांना मोठा त्रास सोसावा लागत असुन याच संधीचा फायदा घेत काही खाजगी अवैद्य वाहतुक करणाऱ्यांकडुन प्रवासांची अव्वा की सव्वाभाडे वसुली करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या असुन , प्रवासांच्या या अडचणीकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनीच या प्रश्नाकडे लक्ष देवुन भुसावळ हुन यावल कडे रात्री ८ते १०पर्यंतची बससेवा पुर्वरत करावी अशी मागणी असंख्य प्रवासी यांच्याकडुन होत आहे .