Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणार्‍यांचे परवाने तत्काळ रद्द होणार

by Divya Jalgaon Team
February 10, 2021
in राज्य
0
खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणार्‍यांचे परवाने तत्काळ रद्द होणार

मुंबई, वृत्तसंस्था – खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करून कोणी राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असेल तर यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही. याविरोधात अन्न व औषध विभागाची मोहिम अधिक तीव्र करण्याबरोबरच खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणार्‍यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी एफडीएच्या अधिकार्‍यांना दिले.

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये खाद्य तेलांमध्ये भेसळ होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत, याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाची महत्वपूर्ण आढावा बैठक अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत खाद्य तेलातील भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना, भेसळ ओळखण्यासाठी जनजागृती, भेसळ करणारी दुकाने, कंपन्या, आस्थापना, दुकानदारांवर थेट धाडी टाकून कडक कारवाई करावी. तसेच खाद्य तेलात वारंवार भेसळ करणार्‍या व्यावसायिकांचे अन्न परवाने तत्काळ रद्द करण्याचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.

याबरोबरच मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण या विभागांचा आढावा घेत अधिकारी वर्गाला महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. खाद्य तेलाबरोबरच प्रतिबंधित अन्न पदार्थ, दूध आणि दूग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविषयी विभागाने सर्तक राहून भेसळखोरांविरोधात कडक कारवाई करावी आणि त्यांच्यावर प्रशासनाचा वचक बसवावा असे आदेशही दिले. याच माध्यमातून राज्यातील जनतेच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असे यड्रावकर यांनी सांगितले. मुंबई, पुणे आणि कोकण विभागात काही प्रमाणात कारवाई होताना दिसतात, त्याचप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रात कडक कारवाई करण्यात याव्यात. तसेच या कारवायांबाबतचा अहवाल २० फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Share post
Tags: Marathi NewsMumbaiखाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणार्‍यांचे परवाने तत्काळ रद्द होणार
Previous Post

आता गुगल मॅप्समध्येही शोधता येणार “आधार’ केंद्र

Next Post

मोठी बातमी : म्हाडाची 7 हजार 500 जणांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Next Post
मोठी बातमी : म्हाडाची 7 हजार 500 जणांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार

मोठी बातमी : म्हाडाची 7 हजार 500 जणांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group