पुणे, वृत्तसंस्था : भारतीय नागरिकांसाठी दैनंदिन वापराच्या सेवांचा शोध घेण्यासाठी आता गुगल मॅप्सने आणखी कितीतरी कॅटेगिरीजचा समावेश आपल्या ऍपमध्ये केला असून त्याद्वारे ‘आधार कार्ड केंद्र’, अंगणवाडीपासून अगदी बांगड्यांचे दुकानही शोधता येणार आहे. गुगल्क मॅप्सचा भारतातला वाढता वापर आणि विश्वासार्हता याचा विचार करता गुगलकडून या नव्या कॅटेगरीजचा समावेश केला गेला असल्याचे समजते. याविषयी गुगल मॅप्सचे भारतीय मॉडरेटर तुषार सुरडकर यांनी लोकल गाईड्स कनेक्टवर माहिती दिली आहे. पाहूया खास भारतीयांसाठी काय आहेत गुगल मॅप्सच्या सुविधा…
1. आधार केंद्र – अमेरिकेत सामाजिक सुरक्षा क्रमांक किंवा एसएसएनसारखेच महत्त्व असलेले भारतीय आधार कार्ड हे नागरिकत्त्वाचे अधिकृत कागदपत्र आहे. आता गुगल मॅप्सवरुन ‘आधार कार्ड केंद्र’ शोधता येणार आहेत.
2. अंगणवाडी केंद्र – ही राज्य सरकार अनुदानीत सामुदायिक शाळेसहची आरोग्य केंद्रे आहेत. या अंगणवाड्यांची माहितीही गुगल मॅप्सवर मिळणार आहे. गुगल मॅप्सचे लोकल गाईड म्हणून कार्यरत असणारे कल्याण पाल यांनी अंगणवाडी अर्थात आयसीडीएस प्रवर्गासाठी विचारणा केली होती.
3. आसामी रेस्टॉरंट – तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात फिरलात, तरी आसाम राज्यातील खाद्यपदार्थ तुम्ही जिथे आहात, तिथून जवळ कुठे मिळतील, हेही समजणे सोपे जाणार आहे.
4. ऑटो रिक्षा स्टॅंड – ही 3 सीटर प्रवासी वाहने आहेत आणि त्यांनी भारतातील प्रत्येक लहान आणि मोठ्या शहरातील प्रत्येक रस्त्यावर पिक अप स्पॉट्स नियुक्त केले आहेत.
5. बांगड्यांची दुकाने – भारतीय स्त्रिया आपल्या मनगटांवर धारण करतात असा एक सौभाग्य अलंकार म्हणजे बांगड्या. या बांगड्या धातूच्या अर्थात सोन्याच्या असतील तर त्या ज्वेलरी शॉप्समध्ये मिळतात. पण बांगड्या काचेच्या असतील, तर त्याची दुकाने निराळी असतात. अंगठी परिधान करण्याइतकाच बांगड्या परिधान करणे हा भारतीय विवाह सोह्ळ्यात एक अविभाज्य भाग असतो.
6. बाइक वॉश – ही कार वॉश सेंटर सारखीच असतात. परंतु ही सुविधा केवळ भारतातील दुचाकी वाहनांसाठीच देण्यात आली आहे, कारण भारतात कार्सपेक्षा दुचाकींची संख्या मोठी आहे.
7. सहकारी बॅंक – अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागात सहकारी बॅंकांमुळे विकस झाला आहे. बॅंकांची ही विशेष श्रेणी ना सरकार चालवते आणि ना खाजगी क्षेत्र. अशा सहकारी बॅंकांची कॅटेगिरीही मॅप्समध्ये पहायला मिळेल.
8. सायकल रिक्षा स्टॅंड – ही पाच सीटर प्रवासी वाहने रिक्षासारखी आहेत. परंतु ही वाहने मानवी श्रमावर चालवली जातात. त्यांचेही निराळे सायकल-रिक्षा स्टॅंड्स असतात.
9. शासकीय शिधावाटप दुकान – शासकीय अनुदान दराने धान्य, साखर आणि केरोसिनची विक्री करणारी ही सरकारी दुकाने आहेत.
10. भारतीय मिठाईंचे दुकान – गोड खाण्याबाबत भारतीयांचा हात जगात कोणीही धरु शकणार नाही. सातारचे कंदी पेढे असोत, की मथुरेचा पेठा; गुजराती किंवा बंगाली मिठाईची नजाकत औरच असते. स्विट मार्ट हा भारतातील एक मोठा उद्योग आहे. त्यामुळे त्याचाही समावेश मॅप्समध्ये केला आहे.
11. मोमो रेस्टॉरंट – संपूर्ण देशभरात या वाफवलेल्या डंपलिंग्जचा आनंद घेतला जातो परंतु ईशान्येकडील डोंगराळ प्रदेशातील रहिवाशांकडून ते पूर्णपणे विकले जातात.
12.पान शॉप – ‘पान खाये सैया हमारो…’ ही तर भारतीयांची खासोयत आहे. ही पानसुपारी अर्थात बीटल नटची दुकाने आहेत आणि भारतातील प्रत्येक रस्त्यावर यापैकी 2-4 दुकाने असतीलच.
13. पाणीपुरी स्टॉल – पाणीपुरी हा भारताचा राष्ट्रीय स्नॅक आहे. पण अनेकदा ही दुकाने दररोज जागा बदलत असतात किंवा फिरत्या वाहनांवरही पाणीपुरी विकली जाते. तरिही निश्चित एका जागी पाणीपुरी वर्षानुवर्षे विकली जात असेल, अशा पाणीपुरी स्टॉल्सचीही माहिती मिळणे आता सोपे जाईल.
14. साडी शॉप – साडी हा भारतीय महिलांचा राष्ट्रीय पोशाख आहे. त्यामुळे शॉपींग कॉम्प्लेक्ससह गावोगावी साडी शॉप्स असतातच आणि त्यांचे वेगळेपणही साडीच्या प्रकारानुसार असते; जसे की पैठणी, कांजीवरम, प्युअर सिल्क इत्यादी.
15. टिफिन सेंटर – हे घरगुती जेवणाचे टेक-अवे फूड काउंटर आहेत जिथे ग्राहक मासिक सदस्यता घेतात आणि प्रत्येक ऑर्डरसाठी पैसे देत नाहीत. अशा टिफिन सेंटर्सचीही माहिती मॅप्सवर मिळणार आहे.
16. टायर रिपेयर शॉप – ही भारतातील प्रत्येक रस्त्यावर आढळणारी सेवा आहे. अमेरिकेप्रमाणे टायर-चेंज सारखीच ही दुकानेदेखील आहेत. पण भारतातील ही दुकाने टायर दुरुस्त करण्याची काटेकोरपणे पूर्तता करतात. पण येथे रिम किंवा चाक दुरुस्तही करता येत नाही.