जळगाव प्रतिनिधी । ई – सेवा केंद्रातून २५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरुन नेणारा संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी संशयिताला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संशयित आरोपीचे नाव अक्षय प्रकाश छाडेकर (वय २३, भोई गल्ली, पाळधी ता. जामनेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जामनेर शहरातील नवकार प्लाझा येथील दुकानातून लॅपटॉप चोरीला गेला होता. या प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे यांनी अक्षय छाडेकर यास पाळधी ता. जामनेर येथुन शिताफीने अटक केली. अक्षय प्रकाश छाडेकर हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याला पुढील तपासकामी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.