जळगाव प्रतिनिधी । इकरा सोसायटीचे जनरल सेक्रेटरी हाजी गफ्फार मलीक यांना ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी, चेन्नईतर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यानिमित्तान शहरातील मानियार बिरादरीतर्फे सत्कार करण्यात आला.
रविवारी ७ फेब्रवारी रोजी सायंकाळी शनीपेठेतील त्यांच्या निवासस्थानी हा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष सय्यद चाँद, सचिव सलीम मोहम्मद, मुस्लीम इदगाह ट्रस्टचे सहसचिव अनीस शाह आदी उपस्थित होते. मलिक यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत परराज्य विद्यापीठाने पीएच.डी. देणे हा एक प्रकारे जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्र राज्याचा गौरव असल्याचे, मत मनियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख यांनी व्यक्त केले.
गफ्फार मलिक यांना मिळालेल्या पीएच.डी.बाबत जळगाव शहरात त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा अंजुमन तालीमुल मुस्लिमीन ही संस्था व मानियार बिरादरीच्या सयुक्त विद्यमाने एका भव्य अशा हॉलमध्ये करण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यात इतर संस्थांना-संघटनांना सुद्धा सहभागी होता येईल, असे आवाहन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ.बाबू शेख यांनी केले आहे.