भुसावळ प्रतिनिधी । तलाठी आणि कोतवाल यांना उतार्यावरील बोजाचे नाव कमी करण्यासाठी अवघ्या २४० रूपयांची लाच स्वीकारतांचा अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज रंगेहात अटक केली आहे.
कुर्हे पानाचे येथील एका शेतकर्याला आपल्या उतार्यावरील बोजा कमी करायचा होता. यासाठी तलाठी प्रवीण मेश्राम व कोतवाल प्रकाश अहिरे यांनी त्यांना लाच मागितली. याबाबत तडजोड होऊन २४० रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, संबंधीत शेतकर्याने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार एसीबीचे उपअधिक्षक गोपाल ठाकूर यांनी एका पथकाची नियुक्ती केली. या पथकाने आज दुपारी एकच्या सुमारास तलाठी प्रवीण मेश्राम व कोतवाल प्रकाश अहिरे यांना २४० रूपये स्वीकारतांना अटक केली. याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.