जळगाव – आज दिनांक 7 रोजी वार रविवार या दिवशी शासकीय बहूउद्देशीय दिव्यांग समीश्र केंद्र जळगाव येथे महाराष्ट्र राज्य प्रदेशअध्यक्ष प्राचार्य विनोदजी गायकवाड सर यांच्या अध्यक्ष ते खाली ग्राहक संरक्षण फाउंडेशन पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी आधी वृक्षारोपण करण्यात आले.मग कार्यक्रमाला सुरवात झाली.
प्रदेश अध्यक्ष यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल तसेस ग्राहकांन ची फसवणूक कशा प्रकारे होते आणि आपण ग्राहकांना कशा प्रकारे न्याय दयावा, तसेच अन्न नागरी पुरवठा या बद्दल सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले आणि ग्राहक संरक्षण फाउंडेशन च्या कार्या बद्दल सुद्धा माहिती दिली,ग्राहक संरक्षण चे कार्य हे सध्या 16 राज्या मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष श्री. डी. व्ही. पाटील साहेब आणि राष्ट्रीय महा सचिव श्री. निलेश भोईर साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार योग्य रित्या वाटचाल सुरु आहे.आपण सर्वानी मिळून ग्राहक संरक्षण परिवार म्हणून कार्य करू आणि मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.
तसेस 15 मार्च हा ग्राहक दिना आपण सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठया उत्साहात साजरा करायचा आहे असे,प्रदेश अध्यक्ष प्राचार्य विनोदजी गायकवाड सर यांनी सांगितले. तसेस जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय महाजन यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.या बैठकिला रियाज शेख महाराष्ट्र राज्य कार्यलयीन सचिव, पराग वारके कोषागार,हितेश तायडे जिल्हा उपाध्यक्ष, सुरेश पाटील जिल्हा सचिव, अतुल साळवे जिल्हा सचिव, अतुल कोळी जिल्हा सचिव, सरफराज तडवी जिल्हा सहसचिव, सुरेश पाटील जिल्हा सचिव, संदीप कोळी जिल्हा सचिव, नितीन सूर्यवंशी सदस्य, भगवान कोई सदस्य, खेमराज कोळबे सदस्य हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल दांडगे जिल्हा उपाध्यक्ष,तर आभार जिल्हामहासचिव राहुल कोल्हे यांनी केले.