Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनतर्फे नारीशक्तीचा सन्मान

by Divya Jalgaon Team
October 26, 2020
in जळगाव
0
jalgaon news

जळगाव –  समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना नवरात्र उत्सवचे औचित्य साधून समाजातील कोरोना संकटकाळात आपल्या कार्याच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने श्री. स्वामी समर्थ स्कूल आव्हाने या ठिकाणी मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने नारीशक्ती सन्मान-२०२० ने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात स्वच्छता कर्मचारी महिलांना साडी व मिठाई वाटप करण्यात आले.

याप्रसंगी  श्री. स्वामी समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील यांनी प्रतिपादन केले कि,  लॉकडाऊनच्या  परिस्थितीत व कोरोना व्हायरस संकटकाळात सामाजिक शैक्षणिक, आरोग्य,वैद्यकीय क्षेत्रात महिलांनी सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता बेघर, गरजू, गरीब, यांच्यासाठी अतोनात कार्य केले आहे . शासनाच्या नियमाचे पालन करत व स्वताची काळजी घेत जळगांव शहरातील नागरिकांसाठी डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, महिला, शिक्षक, समाजसेविका यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी होऊन नागरिकांच्या हितासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता केलेले कार्य प्रेरणादायी आहेत.

यावेळी  भारती ढोलपुरे, प्रतिभा आहिरे , जया  पवार, अनिता  शिरसाठ, विद्या गोधडे, माया  सारवान, अलका  सपकाळे, कस्तुराबाई बाविस्कर, रेखा आहिरे, मीराबाई  बोरोले यांना नारीशक्ती सन्मान-२०२० ने सन्मानित करण्यात आले.

श्री. स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष तथा ग.स.सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील यांचा मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला . यावेळी उपस्थित मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, नगरसेवक नवनाथ  दारकुडे, नगरसेविका  गायत्री शिंदे, कमल केशव प्रतिष्ठानचे सचिव ऍड.अभिजीत रंधे, प्रगती विद्या शाळेचे उपक्रमशील शिक्षक मनोज भालेराव,  सोमनाथ पवार, चौधरी, मुख्यध्यापिका वैशाली शिंदे, मुख्यध्यापिका हर्षाली पाटील . श्री. स्वामी समर्थ ग्रुपच्या संचालिका प्रतीक्षा पाटील व श्री. स्वामी समर्थ स्कूलच्या मुख्यध्यापिका  हर्षाली पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्यध्यापिका वैशाली शिंदे, संगिता देशमुख, दीपमाला बाविस्कर, प्रज्ञा बाविस्कर, दिशा पाटील, महेंद्र साळुंखे, सद्दाम तड़वी, सचिन वंजारी, शिक्षकेतर कर्मचारी-आकाश खैरे, प्रसन्न कोळी, संदीप  मोरे यांचे परिश्रम लाभले. सूत्रसंचालन चैताली पाटील तर  आभार मोहिनी सुरवाडे यांनी केले.

Share post
Tags: Jalgaon newsMarathi NewsMaulana Aazad Foundaition
Previous Post

कर्जबाजारी शेतकरी पोहचला थेट मातोश्रीवर

Next Post

रोहित शर्मा करणार लवकरच पुनरागमन

Next Post
sport news

रोहित शर्मा करणार लवकरच पुनरागमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group