जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सुसज्ज आरोग्य उपकेंद्राची निर्मिती १ कोटी ५८ लाख रूपयांच्या निधीतून होणार आहे. नशिराबाद येथील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून एक प्राथमिक आरोग्य केंद्र पुरेसे नव्हते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी निरंतर पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नशिराबाद गावात दुमजली आरोग्य उपकेंद्राची उभारणी होणार असून त्यासाठी एक कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
नशिराबाद गावाचा वाढता विस्तार पाहता प्राथमिक आरोग्य केंद्र अपूर्ण पडत होते. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून हायवेच्या पलिकडे असलेल्या मुक्तेश्वरनगर, दत्तनगर, ख्वॉजानगर, ताजनगर परिसरातील रहिवाशांना अडचण निर्माण होऊ नये याकरिता ग्रामपंचायतीच्या ओपन प्लेसमध्ये लवकरच आरोग्य उपकेंद्राची दुमजली इमारत उभी राहणार आहे. तसेच एक प्राथमिक आरोग्य केंद्र तर आठवडे बाजार परिसरात पहिले आरोग्य उपकेंद्र आणि आता मुक्तेश्वर नगर परिसरात अत्याधुनिक दुसर्या दुमजली आरोग्य उपकेंद्राची निर्मिती होणार आहे.