जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ३८ रूग्ण आढळून आले आहेत. तर ३१ बाधित रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही.
जळगाव शहर-१०, जळगाव ग्रामीण- १, भुसावळ-५, अमळनेर- ०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव- ०, धरणगाव- ३, यावल- ८, एरंडोल-०, जामनेर- ६, रावेर- ०, पारोळा-०, चाळीसगाव- ४, मुक्ताईनगर- १ आणि बोदवड- ० असे एकुण ३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ३०७ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५५ हजार ६३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ३५९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.