चाळीसगाव, प्रतिनिधी – शिवनेरी फाउंडेशन संचालित अभियान अंतर्गत भूजल अभियाना मध्ये चाळीसगाव तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली. खरंतर चाळीसगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने तुफान आलया हेच वाक्य म्हणावे लागेल. कारण तालुक्याचे लाडके आमदार श्री मंगेश दादा चव्हाण आणि पुणे येथील संगणक अभियंता श्री गुणवंत सोनवणे यांच्या माध्यमांमधून तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून राबवण्यात येणारे भूजल अभियानाच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होतांना आपल्याला दिसत आहेत.
आज कुंझर या गावी नाम फाउंडेशन च्या सहकार्यातून मिळालेल्या पोकलेन मशीन द्वारे जलसंधारणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. कुंझर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर पाणी अडवण्यासाठी नाला खोलीकरण करून घेत, स्वखर्चाने डिझेल टाकून पोकल्यान मशीन उपलब्ध झाल्याने कामांना सुरुवात केली आहे. खरेतर शास्त्र आणि शिस्त या दोन गोष्टींना अनुसरून आपले गाव पाणीदार करण्यासाठी कुंझरकर सरसावले आहेत.
चाळीसगाव तालुक्यात मागील दोन वर्षांपासून शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानाच्या माध्यमातून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही तालुक्यातील २५ गावांमध्ये कामे होऊन ५३ कोटी लिटरचा जलसाठा निर्माण झाला आहे. यावर्षी ३५ गावांचे नियोजन पुर्ण झाले असुन ३५ गावांची माहिती संकलन करून लवकरात लवकर गावांचा जल आराखडा ही तयार होणार आहे. जल आराखडा तयार करून तांत्रिक दृष्ट्या जल संधरणाचे काम खूप मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याचे उद्दीष्ट शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियान चाळीसगाव हे अभियान साध्य करणार आहे. त्या अनुषंगाने नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेल्या पोकलॅन्ड मशिनच्या कामाचा नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ शनिवार दि-६ रोजी कुंझर गावापासुन झाला.
सदर कामाचे उद्घाटन चाळीसगाव तालुक्यातील आमदार मंगेश दादा चव्हाण व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी माजी जि प सदस्य धर्मा आबा वाघ, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नाम फाउंडेशनचे समन्वयक प्रदीप पान पाटील, कृषी सहायक तुफान खोत, ग्रामसेवक निकुंभ भाऊसाहेब, मगनदादा बैरागी, पोहरे येथील काकासाहेब माळी, पंजाबराव अहिरराव, भूजल टीमचे तालुका समन्वयक राहुल राठोड, तांत्रिक प्रशिक्षक महेंद्र पाटील, तालुका सह समन्वयक सम्राट सोनवणे व पंचक्रोशीतील शेतकरी नवल पवार, दयाराम सोनवणे, किरण पाटील, श्याम सोनवणे, दयाराम राठोड, भैय्यासाहेब पाटील, अमोल सोनवणे, रमेश चित्ते, भगवान सोनवणे, गोपाळ बैरागी ,दीपक बैरागी, प्रल्हाद सोनवणे, समाधान महाजन, योगेश देवरे, राहुल ठिवरे, प्रवीण वाघ, दिनेश पाटील, बालू पेहलवान, आर आर पाटील, श्याम सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते.