Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धरणगावात महिला बचत गटांचा मेळावा उत्साहात संपन्न

by Divya Jalgaon Team
February 7, 2021
in जळगाव, प्रशासन, सामाजिक
0
धरणगावात महिला बचत गटांचा मेळावा उत्साहात संपन्न

जळगाव – महिला बचत गट ही एक योजना नसून महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण आणि आर्थिक सशक्तीकरणाची सुप्त चळवळ बनली आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती निर्माण झाली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले.

धरणगावात महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित करतांना ना. गुलाबराव पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महिला या उपजत बचत करणाऱ्या असतात. घरातील खर्चाचे योग्यप्रकारे नियोजन करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. याच गुणाला महिला बचत गटांच्या माध्यमातून व्यापक स्वरूप मिळालेले आहे. यामुळे महिला बचत गटांची संकल्पना रुजल्यानंतर महिलांना एक वेगळे व्यासपीठ मिळाले आहे. त्यातून महिलांमध्ये जिज्ञासू भावना तयार झाली आहे. बचतगट हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल बनविण्यासाठी उत्तम संधी आहेत. रोजगार आणि आत्मसन्मान या दोन्ही गोष्टी बचतगटाच्या माध्यमातून स्त्रीयांना मिळत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती होती.

223 बचतगटांना 2 कोटी 49 लक्ष रुपयांचे कर्ज मंजूर
तालुक्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती व संबंधित बँक यांनी 223 बचत गटांना 2 कोटी 49 लक्ष रुपयांचे कर्ज मंजूर केले असून या बचतगटांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्ज मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, जि प सदस्य गोपाल चौधरी, भगवान महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. बँकेचे विक्रमसिंग नेगी व अकबर बेपारे यांनी महिलांनी वेळेवेळी कर्ज फेड केल्यास त्यांच्या उद्योगधंद्याला चालना देण्यासाठी बँक सतत सहकार्य करेल असे आश्वासनही दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विस्तार अधिकारी पंजाबराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी संजय धनगर यांनी मानले.

कार्यक्रमाला अग्रणी बँकेचे समन्वयक अरुण प्रकाश, एचडीएफसी बँकेचे अकबर बेपारे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे विक्रमसिंग नेगी, गुलाबराव वाघ, पस सभापती मुकुंदराव नन्नावरे, जिप सदस्य गोपाल चौधरी, प्र. नगराध्यक्षा सौ. कल्पना महाजन, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, राजेंद्र महाजन, सुरेश नाना चौधरी आदि उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँक व पंचायत समितीमार्फत तालुका समन्वयक किरण महाजन, चंद्रकांत सोनवणे, हेमांगी टोकेकर, श्याम राठोड यांच्यासह पंचायत समिती व संबंधित बँकेचे अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Share post
Tags: DharangaonGulabrao PatilJalgaonMarathi Newsधरणगावात महिला बचत गटांचा मेळावा उत्साहात संपन्न
Previous Post

महाराष्ट्र जन क्रांती मोर्चातर्फे माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

चाळीसगाव तालुक्यात नाला खोलीकरण, रुंदीकरण कामाचा शुभारंभ

Next Post
चाळीसगाव तालुक्यात नाला खोलीकरण, रुंदीकरण कामाचा शुभारंभ

चाळीसगाव तालुक्यात नाला खोलीकरण, रुंदीकरण कामाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group