बिर्याणीसाठी
बिर्याणी मसाला -4 चमचे ,हळद -अर्धा टीस्पून , चिकन मसाला-1 टीस्पून , हिरव्या मिरच्या- 7/8 (आवडीनुसार) , कोथिम्बीर-एक कप , पुदीना-एक कप , आले+लसूण पेस्ट- 2 चमचे , टोमेटो-3 , कांदे -4 ते 5 मोठे खडा गरम मसाला दालचिनी-२ लवंगा -4 , काळीमिरी -4 ते 5 , तेजपत्ता -3 ते 4 पाने , जिरे – अर्धा टीस्पून , शहाजिरे -अर्धा टीस्पून , चक्री फूल-2 , मसाला वेलची -2 , विलायची -4 , लिंबू – अर्धे कापुन, चविनूसार मीठ.
कृती –
1) गावरान कोंबडीचे चिकन स्टॉक- (अळणी चिकन रस्सा)
प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. 3 मोठे कांदे उभे चिरावेत. एका मोठ्या पातेल्यात 4 पळ्या तेल गरम करत ठेवावे . मग त्यात खडा मसाला घालावा. थोडा परतला की कांदे घालावेत. कांदे जरासे फ्राय झाले की 2 टीस्पून आले लसूण पेस्ट घालावी. छान गोल्डन फ्राय करावे. मग दीड टीस्पून हळद घालावी. परतून त्यात धुतलेले चिकन घालावे. चमचा ते दीड चमचाभर मीठ घालावे . हलवून मध्यम आचेवर झाकून ठेवावे. एकीकडे 4 ते 5 ग्लास पाणी गरम करत ठेवावे.
चिकनला तोवर छान पाणी सुटलेले दिसेल. ते पाणी आटलेले थोडे दिसले की मग त्यात अवश्यकता अनुसार 3 4 ग्लास गरम पाणी घालावे व चिकन अर्ध्यापेक्षा जास्त शिजवून घ्यावे. पुर्ण शिजवू नये. छान स्टॉक तयार होइल. वरुन अर्धा कप कोथिंबीर चिरुन त्यावर घालुन मग गैसवरुन उतरवून घ्यावे.
आता त्यात 2 चमचे मिरची पेस्ट घालावी.छान फ्राय झाली की हळद घालावी. छान परतून कोथिंबीर +पुदीना वाटण घालावे. 5 मिनिट छान फ्राय होऊ द्यावे. मग चिरलेले टोमॅटो घालावे. बिर्याणीचा मसाला घालावा. मीठ घालावे. अजुन 5 ते 7 मिनिट परतुन घ्यावे. आता त्यात अर्धे चिकन घालावे..(साधारणतः 1 किलो)
5 मिनिट छान परतून घ्यावे. मग तांदूळ घालुन हलकेच परतून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी घालुन हलवावे. अर्धे लिंबू पिळावे. पुन्हा एकदा छान हलवावे. 2 चमचे साजूक तूप घालावे. कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ द्याव्यात व गैस बंद करावा. कुकरची वाफ पुर्ण गेली की कुकर उघडून त्यावर चिरलेली कोथिम्बीर,पुदीना पसरवा. तसेच उभा कापुन क्रिस्पी तळून घेतलेला कुरकुरीत कान्दा ही पसरवू शकता.