मुंबई, वृत्तसंस्था : आयएएस अधिकारी कोणाला होऊ वाटत, प्रत्येकालाच आयएएस होण्याची इच्छा असते मात्र, जे मेहनत, कष्ट आणि ज्यांच्यात जिद्द असते असेच लोक आयएएस होतात. आपल्या देशात केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)च्यामार्फत आयएएस होण्यासाठी परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा लाखो विद्यार्थी देण्यासाठी अभ्यास करतात मात्र, खूपच कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळवता येते. यूपीएससी ही आपल्या देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. दरवर्षी लाखो तरुण केवळ काही जागांसाठी या परीक्षेची तयारी करतात. (See how to prepare for UPSC exam after 12th)
या परीक्षेत यशाची टक्केवारी खूपच कमी आहे. सिव्हिल सर्व्हिस परीक्षा तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही त्याचा निर्णय सर्वप्रथम 12 मध्ये असतानाच घ्या म्हणजे बारावीनंतर पदवीचे शिक्षण घेताना तीन वर्ष तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळेल. एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास करून या परीक्षेची तयारी सुरू करा. त्याशिवाय सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याकडे ठेवा आणि त्यानुसार तयारी करा.
बहुतेक विद्यार्थी त्यांच्या पदवीच्या कोणत्याही एका विषयातून परीक्षेच्या मुख्य टप्प्यासाठी विषय निवडतात. हे आपल्याला सुलभ करते कारण आपण संपूर्ण तीन वर्ष पदवीसह या विषयाचा अभ्यास करतो. याशिवाय इतर निवडक विषयांसाठी तुम्ही स्टडी मटेरियल निवडू शकता किंवा तुम्हाला तज्ञांचा सल्ला मिळू शकेल. चालू घडामोडींच्या तयारीसाठी तुम्ही वर्तमानपत्र आणि बातम्या नियमीत बघितल्या पाहिजेत.
एनसीईआरटी आणि एनआयओएसची पुस्तके वाचू शकता, ही पुस्तके विनामूल्य उपलब्ध आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत या विषयाचा अभ्यास करणे सर्वात महत्त्वाचे आहे, म्हणूनच हा विषय निवडताना तुम्हाला त्या विषयात रस आहे की नाही हे लक्षात ठेवा. जरी कोणत्याही विषयाचा अभ्यास करणे अशक्य नाही, परंतु तरीही ज्या विषयात आपल्याला रस आहे त्या विषयांची निवड करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. यूपीएससी परीक्षेच्या मोठ्या अभ्यासक्रमामुळे वर्षभर अभ्यास करावा लागतो. म्हणून, वेळापत्रक तयार करून वर्षभर अभ्यास करणे आवश्यक आहे.
यूपीएससी परीक्षेत यश मिळविण्यासाठी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. कारण सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही बँकिंग किंवा एसएससी परीक्षा नसते ज्यात यश लगेचच मिळते. तर या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला त्याग करावा लागेल, त्याशिवाय या परीक्षेत तुम्ही यश मिळू शकत नाहीत. यूपीएससी परीक्षेली तुम्हाला दोन ते तीन वर्षे द्यायची आहेत. या वर्षांमध्ये आपल्याला दररोज नियमित अभ्यास करावा लागतो.
बरेच लोक म्हणतात की, यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला जाणे आवश्यक आहे मात्र, हे खरंच गरजेच आहे का हे आपण बघणार आहोत. यूपीएससी परीक्षेची तयारी आपण घरी बसूनही करू शकतो. फक्त आपल्याला जीवनात काही बदल करावे लागतील योग्य अभ्यासाच्या साहित्यासह घरातून सिव्हील सर्व्हिसेसची परीक्षा देखील पास करू शकता. आपल्या शहरात राहून देखील यूपीएससीचा अभ्यास करू शकता. तुम्हाला वाट असेल की, तुम्ही फक्त घरी बसून अभ्यास करत परीक्षेची पूर्ण तयारी करू शकत नाहीत मग अशावेळी तुम्ही कोचिंग क्लासेल लावा.
आपल्याला लेखनाबरोबरच वाचनाचा सराव करावा लागेल कारण पूर्व परीक्षा घेतल्यानंतर आपल्याला ज्या मेन लिहायच्या आहे त्या टेस्टची परीक्षा घ्यावी लागेल. सुमारे 200 शब्दांत कोणत्याही विषयावर थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. आपण जितके अधिक लिहायचा प्रयत्न कराल तितकी आपली लेखन शैली सुधारेल आणि व्याकरणात कमी चुका होतील.