नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशांतर्गत बाजारात अजूनही पेट्रोल-डिझेलच्या किमती काहीशी स्थिर आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल मार्केट सातत्याने वर जात आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूड तेलाने प्रति बॅरल 59 डॉलरचा टप्पा पार केला. देशांतर्गत बाजारात आज सलग दुसर्या दिवशी दोन्ही इंधनांमध्ये कोणतीही वाढ दिसून आलेली नाही. आदल्या दिवशी याची किंमत प्रतिलिटर 30 पैशांनी वाढली होती. त्याआधी एक दिवस ते प्रति लिटर 35-35 पैशांनी वाढले होते. दिल्लीत रविवारी पेट्रोल 86.95 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रतिलिटर स्थिर राहिले.
नवीन वर्षात पेट्रोल 03.24 रुपयांनी महाग
नवीन वर्ष पेट्रोलियम इंधनासाठी चांगले राहिलेले नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात फक्त 12 दिवसांत पेट्रोल महाग झाले असले तरी या दिवसांत ते 03.24 रुपयांनी महागले. यामुळे, जवळजवळ सर्व शहरांमध्ये पेट्रोल ऑलटाइम उच्च किमतीवर गेले. यापूर्वी मागील वर्षाच्या उत्तरार्धातही पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. जर पाहायला गेल्यास 10 महिन्यांत त्याची किंमत सुमारे 17 रुपयांनी वाढली आहे.
डिझेलदेखील 03.26 रुपयांनी महाग
पेट्रोलसह डिझेलची किंमतही नवा रेकॉर्ड बनवण्याच्या मार्गावर आहे. काल डिझेल देखील प्रति लिटर 35 पैशांनी महागले. आज पुन्हा ते प्रतिलिटर 30 पैशांनी महाग झाले. नवीन वर्षात 12 दिवसांत डिझेल प्रति लिटर 03.26 रुपयांनी महाग झाले आहे. पाहायला गेल्यास 10 महिन्यांतच त्याची किंमत 15 रुपयांपेक्षा जास्त वाढली आहे.
आपल्या शहरात पेट्रोल डिझेलची किंमत किती?
>> दिल्लीत पेट्रोल 86.95 रुपये तर डिझेल 77.13 रुपये प्रतिलिटर आहे.
>> मुंबईत पेट्रोल 93.44 रुपये तर डिझेल 83.99 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 88.01 रुपये तर डिझेल 80.71 रुपये प्रतिलिटर आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 89.39 रुपये तर डिझेल 82.33 रुपये प्रतिलिटर आहे.
>> बेंगळुरूमध्ये पेट्रोल 89.85 रुपये तर डिझेल 81.76 रुपये प्रतिलिटर आहे.
>> नोएडामध्ये पेट्रोल 86.14 रुपये तर डिझेल 77.54 रुपये प्रतिलिटर आहे.
>> गुरुग्राममध्ये पेट्रोल 85.02 रुपये आणि डिझेल 77.69 रुपये प्रति लिटर आहे.
दररोज 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.