Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शहरात ३० सीएनजी स्टेशनची जून अखेरला निर्मिती

by Divya Jalgaon Team
February 6, 2021
in राज्य
0
शहरात ३० सीएनजी स्टेशनची जून अखेरला निर्मिती

नाशिक, वृत्तसंस्था – शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने सुरु असलेल्या सीएनजी व पीएनजी भूमिगत गॅस पाईप लाईन व प्रकल्पाचे काम सुरु असून जून अखेरपर्यंत शहरात ३० सीएनजी स्टेशनची निर्मिती पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील आतापर्यंत २५ हजार ग्राहकांनी पीएनजी घरगुती गॅस जोडणी बाबत नोंदणी केली आहे.

त्यातील जवळपास २० हजार घरांतील गॅस पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण झाले आहे अशी माहीती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे प्रकल्प अधिकारी संदीप श्रीवास्तव यांनी दिली. या प्रकल्पाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेऊन प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेतली.

शहरात हायप्रेशर, मिडीयम प्रेशर व लो प्रेशर पाईप लाईनचे काम प्रगतीपथावर असून लवरकरच नागरिकांना घरगुती गॅस उपलब्ध होणार आहे. तसेच सीएनजी स्टेशनच्या माध्यमातून शहरातील फोर व्हीलर वाहने तसेच बसेसला गॅस उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक वापरासाठी देखील गॅस उपलब्ध होणार आहे. या सर्व प्रकल्पाच्या कामकाजाची मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे अभियंता आदित्य रामदासी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून नागरिकांना गॅसच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केलेल्या आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते.

Share post
Tags: #CNG Station#StationJuneMarathi NewsNashikशहरात ३० सीएनजी स्टेशनची जून अखेरला निर्मिती
Previous Post

लाइव्ह अश्लील व्हिडीओ तयार करत असलेले रॅकेट उद्ध्वस्त

Next Post

Breaking : अभिनेता श्रीवास्तव चंद्रशेखरने केली आत्महत्या

Next Post
Breaking : अभिनेता श्रीवास्तव चंद्रशेखरने केली आत्महत्या

Breaking : अभिनेता श्रीवास्तव चंद्रशेखरने केली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group