जळगाव – २ फेब्रु .२०२१ रोजी जळगाव जिल्हा रोलबॉल असोसिएशन द्वारा 18 वा रोलबॉल वर्धापन दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी श्री योगेश नन्नवरे सर तसेच जळगाव जिल्हा रोलबॉल असोसिएशन चे पदाधिकारी व म.न. पा. प्रभाग समिती सदस्य रवींद्र नेरपगारे उपस्थित होते.
रोलबॉल प्रशिक्षक यांच्या उपस्थित संपन्न झाला . कार्यक्रमात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला . तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रोलबॉल असोसिएशन चे सचिव व प्रशिक्षक विशाल मोरे यांनी केले तर प्रीतम मोरे यांनी आभार व्यक्त केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रणव चौधरी ,ओम मोरे, मंगेश कणखरे, कुलदीप पाटील , विद्यार्थी ,रोल बॉल खेळाडू, पालक यांचे सहकार्य लाभले .


