यावल प्रतिनिधी । येथील न्यायालयात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभागाचे न्यायाधीश डी.जी. जगताप यांना उच्च न्यायालयाच्या आदेशावरून निलंबित करण्यात आले आहे.
न्यायाधीश डी.जी. जगताप गुरूवारी कार्यावर असतांना जिल्हा न्यायाधीश एस.डी. जगमलानी हे त्यांच्या न्यायालयात पोहोचले. त्यांनी जगताप यांना निलंबनाचे आदेश बजावले. हे आदेश हायकोर्टाच्या निर्देशानंतर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. न्या. जगताप यांना नेमक्या कोणत्या कारणावरून निलंबीत करण्यात आले हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र थेट न्यायाधिशांनाच निलंबीत करण्यात आल्याने खळबळ उडालेली आहे.