चेन्नई, वृत्तसंस्था : अखेर आज तो दिवस उजाडला आहे. (५ फेब्रुवारी) आजपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. तत्पुर्वी भारतीय नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
तत्पुर्वी भारतीय संघात निवड झालेला अष्टपैलू अक्षर पटेल याला पहिल्या कसोटी सामन्यातील अंतिम ११ जणांच्या पथकात संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र दुखापतीमुळे त्याला खेळण्यापूर्वी संघातून बाहेर जावे लागले आहे.
बीसीसीआयने दिलेल्या ट्विटरद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. अक्षरच्या डाव्या पायाच्या गुडघ्यात वेदना होत असल्याने तो इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अक्षरऐवजी शाहबाज नदिम किंवा राहुल चाहर यांपैकी एकाला संघात संधी दिली जाऊ शकते.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च