यावल (रविंद्र आढाळे) – संपुर्ण जगासह देश आणी महाराष्ट्र राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणु संसर्गामुळे सर्वत्र लॉक डाऊन लावण्यात आल्या कारणाने नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन शासनाने अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले , दरम्यान सात महीन्याच्या कालावधीनंतर आता अनलॉक लागु करण्यात आले असुन , तरी देखील बससेवा पुर्णपणे सुरू झाल्या नसल्याने त्यापुर्वरत सुरू कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कारण्यात आली आहे.
या पार्श्वभुमीवर एसटी महामंडळाने अनेक बंद एसटी बस सेवा पुरर्वत करण्यात आल्या असुन, यावल आगारातुन अद्यापपर्यंत ग्रामीण क्षेत्रातील अनेक बसफेऱ्या मात्र सुरू न केल्याने ग्रामीण क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थी व विद्यार्थीनींना शाळा विद्यालयात येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सोसावे लागत असुन , त्यांचे शैक्षणीक व आर्थिक नुकसान होत असुन एसटी महामंडळाने या यावल तालुक्यातील बंद केलेल्या बससेवा सुरू कराव्यात आणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रावेर जिल्हा अध्यक्ष ( जनहित ) यांच्या मार्गदर्शनाखाली एक लिखित निवेदन यावलचे आगार व्यवस्थापक एस व्ही भालेराव यांना देण्यात आले असुन , या निवेदनावर शाम पवार , किशोर नन्नवरे, विभाग अध्यक्ष आबीद कच्छी, गौरव कोळी , रोहन धांडे , रितेश धांडे , रिषीकेश कानडे , हिमांशु पवार यांच्या स्वाक्षरी आहे . दरम्यान ही ग्रामीण परिसरातील बससेवा पुर्वरत सुरू न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .