जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत १७ वर्षीय मुलाने कोल्हे हिल्स परिसरात नेवून अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिल्याचे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विधीसंघर्षग्रस्त मुलावर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय पिडीत मुलीचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. आईला घरकामात मदत करते, ऑगस्ट २०२० मध्ये मैत्रिणीच्या मार्फत पिडीत मुलीचा एका १७ वर्षीय मुलासोबत ओळख निर्माण झाली. त्यांची ओळख झाल्यानंतर दोघांचे भेट होवून बोलणे सुरू झाले. मुलाने माझ्याशी लग्न करशील का असे सांगितले असता मी लहान असल्याचे मुलीने सांगितले. ऑगस्ट २०२० च्या शेवटच्या आठवड्यात मुलाने मला महत्वाचे बोलायचे आहे, असे सांगून पिडीत मुलीला दुचाकीवर बसवून वाघ नगर परीसरातील कोल्हे हिल्स परिसरातील निर्जळ ठिकाणी नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवत अंगलट केले. तिने नकार दिल्यावर भावाला मारून टाकण्याची दमदाटी केली व तिच्यावर अत्याचार केला व घरी सोडून दिले. हा प्रकार सप्टेंबर २०२० महिन्यात ७ ते ८ वेळेस झाला.
यात पिडीत मुलगी गर्भवती राहिली. याबाबत तिने मुलाला सांगितले असता पिडीतेला ठार मारण्याची धमकी देवून मला पुन्हा भेटू नको अशी धमकी दिली. त्यामुळे सदरील प्रकार पिडीतेने आई व वडीलांना सांगितला. त्यांनी ३ जानेवारी रोजी तालुका पोलीस ठाणे गाठून पोलीसांना सर्व हकीकत सांगितली. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात विधीसंघर्षग्रस्त मुलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधीसंघर्षग्रस्त मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस तालुका पोलीस कर्मचारी करत आहे.