जळगाव प्रतिनिधी । जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी (ग.स.सोसायटी)चे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. ग.स. सोसायटीच्या संचालक मंडळाला बरखास्त करण्यात आल्यानंतर आज या संस्थेचा कारभार प्राधीकृत अधिकार्यांच्या मंडळाने स्वीकारला आहे.
जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी (ग.स.सोसायटी)चे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. यानंतर सोसायटीवर आता सहकार विभागाचे प्राधिकृत अधिकारी मंडळ (प्रशासक) नेमले असून आज त्यांनी पदभार स्वीकारला. ग.स. सोसायटीतील सत्ताधारी लोकसहकार गटाच्या पाच संचालकांनी विरोधी सहकार गटाला साथ देत अध्यक्ष मनोज पाटील यांच्याविरुद्ध बंड केले. दोन्ही गटाच्या १४ संचालकांनी २८ जानेवारीला राजीनामा दिला होता. सोसायटीच्या २१ पैकी १४ संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे अध्यक्ष अल्पमतात आले होते. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्तीची मागणी होती. संबंधीत संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडून पडताळणी करण्यात आली. संबंधित संचालकांनी राजीनामे दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने ग.स.चे संचालक मंडळ बरखास्त झाले.
आज सहाय्यक निबंधक विजय गवळी, सहकार अधिकारी भाऊसाहेब महाले, लेखापरीक्षक प्रशांत विरकर यांचा समावेश असणार्या प्राधिकृत अधिकारी मंडळाने ग.स.सोसायटीचा कारभार हाती घेतला आहे.