जळगाव प्रतिनिधी । जळगावातील पिंप्राळा परिसरातील रेल्वे पुलाजवळ अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळला. मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
जळगाव शहरातील पिंप्राळा उड्डानपुलाच्या खाली असलेल्या रेल्वे रूळावर एका ६० ते ६५ वर्षीय वृध्द मयत स्थितीत आज सकाळी ९ वाजेच्या पुर्वी आढळून आला. भरधाव रेल्वेचा पाठीमागून जोराचा धक्का लागल्याने पाठीच्या पुर्ण बरगड्या तुटून पडल्या होत्या. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान वयोवृध्दाची अद्याप ओळख पटलेली नाही. लोहमार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. रूग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक समाधान कंखरे आणि पो.ना. स्वप्निल महाले करीत आहे.