जळगाव – जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी सोसायटीचे विद्यमान काळजीवाहु अध्यक्ष मनोज पाटील यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून संचालक मंडळातील सदस्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
ग.स.सोसायटी चा संचालक मंडळाचा कार्यकाळ दि.4 जुन 2020 ला संपला होता. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने ग.स.साठी निवडणूक न घेता त्याची मुदतवाढ 31 मार्च 2021 पर्यंत दिलेली आहे. या मुदतवाढीचा गैरफायदा घेत काळजीवाहू अध्यक्ष मनोज पाटील आपल्या मनमानी व एकतर्फी निर्णय घेत असल्याने संचालकांना नाहक त्रास होत आहे.
संचालकांना विश्वासात न घेता त्यांच्याशी अरेरावीची भाषा करीत असल्याची तक्रार आहे. ग.स. सोसायटीच्या हिताविरूध्द निर्णय घेत असल्याची तक्रार सोसायटीचे संचालक उदय मधुकर पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केल आहे. उदय पाटील यांच्यासह काही संचालकही राजीनामा देण्याचे बोलले जात आहे.