जळगाव – मुक्ताईनगर शहरातील श्रीकॉलनीत येथील रविंद्र (माया ) माधवराव तायडे रा.भोईवाडा, मुक्ताईनगर याच्या कडून गावठी बनावटीचे पिस्टल मिळाले असून त्याला जेरबंद करण्यात आले असून त्याला शस्त्र साठा बाळगणे बाबत प्रतिबंधक केलेले असतांना देखील बेकायदा शस्त्र जवळ बाळगल्याने त्याचा विरुध्द मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय मिळाली की, मुक्ताईनगर शहरात शहरात श्रीकॉलनी परिसरात रविंद्र उर्फ माया माधवराव तायडे रा.भोईवाडा ता.मुक्ताईनगर जि.जळगाव त्याचे कब्जात बेकायदेशिर रित्या पिस्टल बाळगुन काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे बेतात आहे.
त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, SDPO विवेक लावंड मुक्ताईनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील पोहेकॉ.सुधाकर अंभोरे,अश्रफ शेख, दिपक पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अशोक पाटील तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ.श्रावण जावरे, गोपीचंद सोनवणे, विजय कचरे यांना रवाना केले होते.
त्यावेळी संशयीत हालचाली करतांना दिसून आला असता त्याची अंगझडतीत पॅन्टला खोचुन ठेवलेले गावठी बनावटीचे पिस्टल मिळुन आले. तसेच जळगाव जिल्हयात शस्त्र साठा बाळगणे बाबत प्रतिबंधक केलेले असतांना देखील रविंद्र तायडे याने बेकायदा शस्त्र जवळ बाळगल्याने त्यांचे विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.