जळगाव – महाराष्ट्र नाभिक महामंडळ ही नाभिक समाजाची नोंदणीकृत संघटना असून या संघटनेमार्फत समाजाचे कामे केले जात असून शासनाकडे प्रलंबित मागण्यासाठी शहराचे आ. राजूमामा भोळे यांना निवेदन देण्यात आले.
बाराचलुतेदाराच्या विकासासाठी बाराबलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे व त्यास दरवर्षी पाचशे कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा तसेच कोरोना कालावधी मध्ये आत्महत्या ग्रस्त नाभिक समाजबांधवास दहा लक्ष रुपये आर्थिक सहकार्य करण्यात यावे व दि.२६ मार्च १९७९ च्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पाठविलेल्या पत्राप्रमाणे नाभिक समाजाच्या अनुसुचित जातीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करण्यात यावी व नाभिक समाजाच्या सलुन कारागिरास दरमहा रुपये ५,०००/- निवृत्ती वेतन (पेंशन) लागु करण्यात यावा आदी मागण्याचे निवेदन आ. राजूमामा भोळे यांना देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रविंद्र (बंटी) नेरपगारे, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर खोंडे, सचिव कुमार सिरामे, सहसचिव अरुण श्रीखंडे, जगदीश वाघ, भिकन बोरसे, भैय्या वाघ यांची उपस्तीथी होती.