जळगांव – प्रजासत्ताक दिनानिमित्त हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खुबचंद सागर मल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन बक्षिसे मिळवली. तसेच यावेळी पात्र विध्यार्थाना बक्षीसे ही देण्यात आली.
अश्विनी चौधरी ,भाग्यश्री चव्हाण, राणी काकडे, एकता चांगरे, प्रतीक्षा सैतवाल, दीपाली चव्हाण, अनुजा बाविस्कर, पुनम शिंदे ,कीर्ती सूर्यवंशी ,रोहिणी बारी, काजल पवार, पायल शिंदे या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सतीश साळुंके पर्यवेक्षक सुरेश आदिवाल अकिल सैय्यद यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आली याप्रसंगी मंगला सपकाळे सुनिता साळुंके योगेंद्र पवार लक्ष्मीकांत महाजन प्रवीण पाटील, विजय पवार मयुर पाटील हे उपस्थित होते.