Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अपार्टमेंटवरून पडून 48 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू

by Divya Jalgaon Team
January 30, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील रथ चौकात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

जळगाव प्रतिनिधी । अपार्टमेंटच्या छतावरून पडून एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शहरातील भिकमचंद जैन नगरातील रहिवाशी विजय प्रल्हाद शिनकर (वय ४८) असे मयताचे नाव आहे. शनिकर हे वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) म्हणून काम करीत होते. मुळचे वरणगाव येथील शिनकर कुटुंबिय गेल्या दोन वर्षांपासून भिकमचंद जैन नगरात राहण्यासाठी आले आहेत. या ठीकाणी सिद्धांत अपार्टमेंटमध्ये चवथ्या मजल्यावर त्यांनी स्वत:चे घर घेतले आहे. घरात पत्नी कल्पना, मुलगी श्रध्दा आणि मुलगा सारंग अश्यांसोबत राहतात.  शिनकर कुटुंबियांनी रात्री १२ पर्यंत गप्पा मारल्या व झोपले. पहाटे चार वाजता मुलगा सारंग झोपेतून उठल्यावर वडील जागेवर दिसून आले नाही. त्यांनी शोधाशोध केली असता मिळाले नाही. शेवटी अपार्टमेटच्या छतावर जावून पाहणी केली व खाली डोकावून पाहिले असता विजय शिनकर यांचा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाडी पडल्याने मृत्यू झाला होता. हे पाहून कुटुंबियांन प्रचंड धक्का बसला.

अपार्टमेंटमधील लोकांच्या मदतीने शिनकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.  शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share post
Tags: Bhikamchand Jain NagarcrimeJalgaonnewsअपार्टमेंटवरून पडून 48 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू
Previous Post

जळगावातील सुप्रिम कॉलनीमधील गोडावूनला आग, लाखोंचे नुकसान

Next Post

शासकीय रुग्णालयात पल्स पोलिओ मोहिमेचा आज शुभारंभ

Next Post
शासकीय रुग्णालयात पल्स पोलिओ मोहिमेचा आज शुभारंभ

शासकीय रुग्णालयात पल्स पोलिओ मोहिमेचा आज शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group