Wednesday, April 1, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील सुप्रिम कॉलनीमधील गोडावूनला आग, लाखोंचे नुकसान

by Divya Jalgaon Team
January 30, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील सुप्रिम कॉलनीमधील गोडावूनला आग, लाखोंचे नुकसान

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील हार्डवेअरच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना आज घडली. या आगीत लाखोंचे नुकसान झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात आग लागल्याची नोंद करण्यात आली.

शहरातील शाहीद शेख मुस्ताक शेख (वय-२८) रा. मास्टर कॉलनी यांचे त्यांचे नशिराबाद येथील आठवडे बाजारात स्टार हार्डवेअरचे दुकान आहे. सुप्रिम कॉलनीतील ममता बेकरीजवळ मित्रांच्या जागेवर दुकानाचे गोडावून आहे. या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये चिनीमातीचे टॉयटेलसह, पाण्याच्या टाक्या आदी सामान ठेवले जाते.

आज सकाळी १० वाजेच्या सुमारास अनाचकपणे पत्र्याच्या शेडमधून धुर निघायला लागल्याचे शेजारचांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब शाहीद शेख यांना संपर्क साधून आग लागल्याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेवून खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापालिकेचे दोन बंब बोलावून ही आगविझविण्यात आली. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या आगीत गोडावून मध्ये ठेवलेले संडासचे चिनीमातीचे भांडे, ५० ते ६० जुने फ्रीज, पाण्याच्या टाक्या, पाईप फिटींगचा सामान, प्लश स्टॅण्ड, पाईपाचे बंडल, सीट कव्हर हे जळून खाक झाले आहे. दरम्यान, या आगीत सुमारे ५ ते ६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीसांनी धाव घेतली असून पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Share post
Tags: crimeFireGaudaunHardwareJalgaonSupreme Coloniजळगावातील सुप्रिम कॉलनीमधील गोडावूनला आगलाखोंचे नुकसान
Previous Post

जळगावातील शिरसोली गावातील दुचाकी लंपास

Next Post

अपार्टमेंटवरून पडून 48 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू

Next Post
जळगावातील रथ चौकात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

अपार्टमेंटवरून पडून 48 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group