जळगाव प्रतिनिधी । जळगावातील शिरसोली गावामधील तरुणाची घरासमोरून दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडी मालक हेमंत गोविंदा बारी (वय-२३) रा. शिरसोली ता. जि.जळगाव हा तरूण शेतकरी आहे. शेताच्या कामासाठी त्यांच्याकडे दुचाकी (एमएच १९ डीडी ४१०२) क्रमांकाचे वाहन आहे. नेहमीप्रमाणे १७ जानेवारी रोजी रात्री आठ वाजात दुचाकी घरासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याचा प्रकार १८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला आहे.
दुचाकी परिसरातून शोधाशोध सुरू केली असता मिळून आली नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.