बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याचदा दोघांना एकत्रित स्पॉट करण्यात आले आहे. त्यामुळे ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, दोघेही आपल्या नात्याचा स्वीकार करत नसले तरीसुद्धा चाहत्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही. कतरिनाने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये तिचे चाहते विकीला शोधत असतात.
असाच काहीसा एक प्रकार उघडकीस आला आहे. कतरिनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये तिच्या चाहत्यांनी विकी कौशलला शोधले आहे. कतरिनाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कतरिनाने बटरफ्लाय फिल्टरमध्ये काढलेला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. कतरिनाने पोस्ट केलेल्या फोमध्ये मस्टड यलो कलर दिसत आहे.
यावरून कतरिनाच्या चाहत्यांनी तिने विकी कौशलला मिठी मारली असल्याच्या अंदाज लावला आहे. एवढंच नाही तर युजर्सनी विकीचा मस्टड यलो कलरचा टी-शर्ट घातलेला फोटो आणि कतरिनाने नुकताच इन्स्टावर पोस्ट केलेला फोटो एकत्र करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
दरम्यान, कतरिना कैफ लवकरच ‘फोन भूत’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ईशांत खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सलमान खानसोबत ती ‘टायगर 3’त सुद्धा झळकणार आहे. याव्यतिरिक्त कतरिना कैफने रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपटात काम केले आहे.