जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे.
जिल्हाभरात पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी पालकमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेट क्रमांक १ मधील मुख्य आवारात लहान बाळांना पोलिओ पाजून सुरुवात करतील. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. रंजना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा “शावैम’ चे प्रशासक डॉ. बी.एन.पाटील, महापालिकेचे महापौर भारती सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार हे उपस्थित राहणार आहेत.