जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरातील जगवानी नगर येथे वृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी 3.45 वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.
जगवानी नगरात रविंद्र बंडू बाविस्कर (वय 62) यांचे तीन मजली घर आहे. तिसर्या मजल्यावर रविंद्र बाविस्कर यांनी गुरुवारी 3.45 वाजेपूर्वी गळफास घेतला. बाविस्कर यांची नातू हे खालच्या मजल्यावर खेळत होते. खेळता ते तिसर्या मजल्यावर गेल्यानंतर त्यांना बाविस्कर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी आरडाओरड करत कुटुंबियांना माहिती. यानंतर कुटुंबियांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलिवले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी डॉ. प्रवीण पाटील यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास सचिन मुंढे हे करीत आहेत.
दरम्यान मयत बाविस्कर हे खाजगी वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी राधाबाई, दोन मुले दिपक व किरण तसेच मुलगी रत्नाबाई, सूना नातवंडे असा परिवार आहे. दिपक व किरण हे एमआयडीसीतील खाजगी कंपनीत काम करतात.