मेष : मनाची संवेदनशीलता दाखवाल. पैजेची हौस पूर्ण कराल. मुलांच्या आनंदात रमून जाल. दिवस आनंदात जाईल. चौकसपणे सर्व गोष्टी जाणून घ्याल.
वृषभ : घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. उत्तम गृहसौख्य लाभेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मानसिक शांतता महत्त्वाची आहे. घरात प्रेमळ वातावरण राहील.
मिथुन : जोडीदाराची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. फार मतवैचित्र दाखवायला जाऊ नका. वादाचे मुद्दे उकरून काढू नका. जवळचा प्रवास करावा लागेल. चांगले वाहन सौख्य लाभेल.
कर्क : अपचनाचा त्रास जाणवू शकतो. मनातील नैराश्य दूर सारावे. जोडीदाराशी मतभेद संभवतात. आरोग्याबाबत सतर्क राहावे. कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका.
सिंह : इतरांच्या मनात आदर निर्माण कराल. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. वातविकाराचा त्रास संभवतो. मुलांच्या धाडसात वाढ होईल. जोडीदाराचा सुशिक्षितपणा दिसून येईल.
कन्या : कामातील उत्साह वाढीस लागेल. घरातील गोष्टीत अधिक लक्ष घालावे. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. प्रवासात सावधानता बाळगावी. नातेवाईकांशी सलोखा निर्माण करावा.
तूळ : कामाचा पुरेपूर आनंद घ्याल. हातातील अधिकार समजून घेऊन वागावे. हितशत्रूंवर विजय मिळवता येईल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. मनातील इच्छेला महत्व द्याल.
वृश्चिक : खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. चोरांपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी. मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक समाधान राखण्याचा प्रयत्न करावा.
धनू : बौद्धिक बाजू सुधारेल. धार्मिक कामात हातभार लावाल. सेवेचे महत्व लक्षात घ्याल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
मकर : अडथळ्यातून मार्ग निघेल. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. काही गोष्टींना वेळ द्यावा लागेल. घरगुती बदल सकारात्मकतेने स्वीकारावेत. मनातून जुन्या गोष्टी काढून टाकाव्यात.
कुंभ : वैचारिक स्थिरता जपावी. आपली संगत तपासून पहावी. मैत्रीत मतभेद आड आणू नका. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. मानसिक चंचलता राहील.
मीन : प्रत्येक गोष्टीत आनंद शोधाल. कला जोपासायला वेळ काढावा. नवीन गोष्टींची ओढ वाढेल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. आपली हौस पूर्ण करता येईल.