जळगाव प्रतिनिधी । जन्मत: कुबड समस्या व बहुविकलांग रूग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे ऑनलाईन उद्घाटन शहरातील गोलाणी मार्केट येथे न्युरोलॉजिस्ट डॉ. राजेश डाबी यांच्याहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला डिजीटल माध्यमातून रेड स्वस्तिकचे संस्थापक अध्यक्ष डॉ. टी.एस.भाल (आयपीएस), सहमहाव्यवस्थापक अशोक शिंदे, डॉ. अमित जैन, मुंबई येथील डॉ. राजेश पांचाळ, प्रमोद नांदगावकर, रेड स्वस्तिकचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश झाल्टे, सचिव डॉ. स्नेहल फेगडे, मुबईतील प्रमोद नांदगावकर, कार्याध्यक्ष जो.बी.पाटील, दिप पाटील, रोशन मराठे, निलेश पाटील यांच्यासह मान्यवरांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला प्रकल्प संचालक डॉ. धनंजय बेंद्रे, महानगर प्रमुख संजय काळे, दिलीप गवळी, डॉ. एस.एस पाटील, डॉ. गणेश पाटील, प्रा. संदीप पाटील, यश पांडे, शशीकांत धोडे, विनोद कोळपकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रियंका पितांबर पाटील रा. तळवेदा ता. चाळीसगाव रूग्णाची मोफत शस्त्रक्रिया करून देवून या प्रकल्पाची सुरूवात होणार आहे. तसचे या प्रकल्पांतर्गत एकुण ६९ विकलांग असलेल्या रूग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक डॉ. स्नेहल फेगडे यांनी दिली आहे.