जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी येथील माहेर असलेल्या ३५ वर्षीय विवाहितेला जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील पतीसह सासरकडील चौघांनी ५० हजार रूपयांची शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पत्नी असतांना दुसरे लग्न करण्यासाठी पतीने हा छळ केल्याचा आरोपी विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे.
अंजूम नयुम पटेल (वय-३५) ह.मु. सुप्रिम कॉलनी यांचा सन २०१६ मध्ये नयुम दादामिया पटेल रा.नाचणखेडा ता. जामनेर यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सुरूवातीचे दोन महिने आनंदाने गेले. त्यानंतर पती नयुम पटेल यांनी मोटारसायकल घेण्यासाठी पत्नीने माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. सासरचे मंडळी सासू नजमा दादामिया पटेल, हमीद दादमिया पटेल, बिलकीस लुकमान पटेल रा. नाचण खेडा यांनी देखील पतीला पाठबळ दिले. यातील बिलकीस आणि नयुम यांच्यात प्रेमसंबंध असल्याने विवाहितेला मारहाण करत जीवे ठार माण्याची धमकी दिली असल्याची विवाहितेने नमूद फिर्यादीत म्हटले आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.