मुंबई | तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री कंगणा राणावत आता भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे. तिनं स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.
आम्ही या प्रोजेक्टवर काम करत आहोत आणि या चित्रपटाची स्क्रिप्ट लवकरच पूर्ण होईल, असं कंगणाने सांगितलं आहे.
हा चित्रपट इंदिरा गांधी यांचा बायोपिक नसेल. मात्र आजकालच्या पिढीला देशातील सद्य सामाजिक-राजकीय परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करणारा भव्य चित्रपट असेल, असं कंगणा म्हणाली आहे.
इंदिरा गांधी म्हणून मी भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप उत्साही आहे, असंही कंगणाने म्हटलंय.