Sunday, April 5, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने सहयोग क्रिटीकल केअरमध्ये तोडफोड

by Divya Jalgaon Team
January 29, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहूनगरातील सहयोग क्रिटीकल केअरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला तेथील डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. तसेच संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड केल्याची घटना घडली. यावेळी डॉक्टरांनाही मारहाणीचा प्रयत्न झाला. याप्रकरणी शहर पोलिसात पारोळा तालुक्यातील विटनेर येथील चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील विटनेर येथील विनोद भिमराव वानखेडे यांचा बुधवारी रात्री चिंचपुरा गावाजवळ अपघात झाला होता. अपघातानंतर उपचारासाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी वानखेडे यांना जळगावातील शाहू नगरातील सहयोग क्रिटीकल केअर रुग्णालयात दाखल केले. डॉ. विनोद किनगे, डॉ. प्रकाश सुरवाडे यांनी वानखेडे यांच्यावर उपचार केले.

काही वेळाने तपासणीत रुग्ण वानखेडे यांची नाडी तसेच ब्लश प्रेशरही होत नसल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी वानखेडे यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. याठिकाणी वानखेडे यांचा मृत्यू झाला. याचदरम्यान रुग्णालयात घेवून जात असतांना माघारी येवून काही जणांनी सहयोग क्रिटीकल केअरच्या डॉक्टरांवर संताप व्यक्त केला. याचवेळी वानखेडे यांच्या मृत्यूचा निरोप आल्यावर नातेवाईकांच्या संतापात आणखीनच भर पडली. संतापात नातेवाईकांनी सहयोग क्रिटीकल केअरमधील आयसीयु कक्षात जावून काचांसह इतर वस्तूंची तोडफोड केली तसेच डॉ विनोद किनगे यांना मारहाणा करण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी त्यांची सुटका केली. नातेवाईकांनी गोंधळ घातल्यानंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास डॉ.विनोद किनगे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन चार ते पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Share post
Tags: crimeJalgaonसंबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने सहयोग क्रिटीकल केअरमध्ये तोडफोड
Previous Post

आता पेट्रोलच्या दरतही वाढ, शंभरी पार

Next Post

डोंगर कठोरा झालेल्या सर्व निकृष्ठ विकास कामांची चौकशी करावी

Next Post
डोंगर कठोरा झालेल्या सर्व निकृष्ठ विकास कामांची चौकशी करावी

डोंगर कठोरा झालेल्या सर्व निकृष्ठ विकास कामांची चौकशी करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group