मुंबई : सर्वसामान्यांचे कंबरडे महागाईने मोडले आहे. आता पेट्रोलच्या दरातही वाढ झाली आहे. देशात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या किमतीने दरवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मध्य प्रदेशच्या अनूपपूर जिल्ह्यात प्रिमियम पेट्रोल दर १०० रुपये लिटरच्या पुढे आहेत. देशात पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरांनी एक लिटरसाठी शंभरीचा आकडा पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा आणखी महागाईत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत.
पेट्रोल, डिझेलचे दर दररोज नवनवे शिखर गाठले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत पेट्रोलचे दर ८६ रुपये आहेत तर मुंबईत पेट्रोलचे दर हे ९३ रुपये इतके आहेत. कोलकातामध्ये डिझेलचे दर ८० रुपये आहेत. दिल्लीत दररोज पेट्रोल आपल्या किंमती उंची गाठत आहे. दिल्लीत दररोज एक दोन दिवसांत डिझेलचे दर ७७ रुपयांच्या पार झाले आहेत. दिल्लीपेक्षा इतर मेट्रो शहरात पेट्रोलचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर ९२.८६ रुपये प्रती लीटर आहे. तर कोलकतामध्ये पेट्रोलचा दर ८७.६९ रुपये तर चेन्नईत हा दर ८८.८२ रुपये प्रती लीटर आहे.
देशात गेल्या काही दिवसांपासून देशातील पेट्रोलचे दर हे प्रचंड वेगाने वाढत चालले आहेत. मध्य प्रदेशातील अनूपपूर येथे पेट्रोल चक्क 100 रुपये दराने मिळत आहे. देशात पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरांनी एक लिटरसाठी शंभरीचा आकडा ओलांडला आहे. अनूपपूरमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार गेले असताना मध्य प्रदेशमधील भोपाळ, इंदूर, जबलपूरमध्ये पेट्रोलची किंमत अनुक्रमे 94.18, 94.27 आणि 94.18 रुपये एवढी झाली आहे. गतवर्षी 16 मार्च रोजी भोपाळमध्ये पेट्रोलचे दर 77.56 रुपये प्रतिलिटर पर्यंत पोहोचले होते. मध्य प्रदेशमध्ये गत एक वर्षात सुमारे17 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढले आहेत.
का वाढत आहे दर?
आंतराष्ट्रीय बाजारात क्रुडतेल स्वस्त आहे. मात्र, असे असताना पेट्रोलदरात वाढ होत आहे. पेट्रोलच्या एक लिटरची किंमत ही 30 रुपये आहे. त्यावर सरकारचा कर, डीलर्स कमिशन आणि वाहतूक खर्चानंतर हे दर 94 रुपयांपर्यंत पोहोचत आहेत. तसेच केंद्र सरकार एक्साइज ड्युटीच्या रूपात सुमारे 33 रुपये आकारते. त्यानंतर विविध राज्यांचा कर लागतो. त्यावर डिलरचे प्रतिलिटर कमिशन 3.50 रुपये आणि ट्रान्सपोर्टेशन खर्च 2.50 रुपये आकारला जातो.


