Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

क्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणारा निवृत्ती

by Divya Jalgaon Team
January 29, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
क्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणारा निवृत्ती

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध क्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी गुरुवारी (२८ जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. २०१२ पासून आयसीसीच्या पंचांच्या एलिट पॅनलचे नियमित सदस्य असलेले ऑक्सनफर्ड यांनी १०६ वनडे, ६३ कसोटी, ३१ टी२० सामन्यात पंचाची भूमिका साकारली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ब्रिस्बेन कसोटी सामना त्यांचा पंचगिरी करण्याचा शेवटचा सामना ठरला.

ऑक्सनफर्ड यांनी जानेवारी २००६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील टी२० सामन्याने त्यांच्या पंच कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. त्यांनी मागील ३ वनडे आणि टी२० विश्वचषकात पंचगिरी केली आहे. सोबतच त्यांनी महिलांच्या 2012 व 2014 मधील विश्‍वकरंडक टी-20 स्पर्धेतही पंच म्हणून काम केले आहे. पंच होण्यापूर्वी ऑक्‍सेनफोर्ड यांनी क्वीन्सलॅंड संघाचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. ते लेग स्पिनर होते.

ऑक्सनफर्ड यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर आयसीसीशी बोलताना म्हटले की, ‘मी एका पंचाच्या रुपात माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अभिमानास्पद समजतो. मला विश्वासच नाही होत की, मी २००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली आहे. मी एवढ्या मोठ्या कारकिर्दीची अपेक्षा केली नव्हता.’

‘मी आयसीसी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी एलिट तथा आंतरराष्ट्रीय पॅनलच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी एवढे वर्षे मला प्रोत्साहित केले आहे. खासकरून क्रिकेटमुळे मला भेटलेल्या काही शानदार व्यक्तींना पाहणे, त्यांच्याशी चर्चा करणे या सर्व गोष्टींची खूप आठवण येईल’, असे त्यांनी पुढे बोलताना म्हटले.

Share post
Tags: Marathi NewsSportक्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणारा निवृत्ती
Previous Post

सोन्याच्या दरात घसरण, खरेदीचा विचार करताय? वाचा आजचे दर

Next Post

आता पेट्रोलच्या दरतही वाढ, शंभरी पार

Next Post
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

आता पेट्रोलच्या दरतही वाढ, शंभरी पार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group