मुंबई : सोन्या-चांदीच्या भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतातील मौल्यवान धातूच्या किंमती घसरल्या. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा दर गुरवारच्या तुलनेत 200 रुपयांची घसरण होऊन 48 हजार 800 वर पोहोचला आहे. गेल्या 10 दिवसांच्या सोन्याच्या दराचा अभ्यास केल्यास 200 रुपयांचा भाव कमी असल्याचं दिसून येते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अमेरिकन डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. स्पॉट सोन्याचे 0.4 टक्क्यांच्या घसरणीसह दर प्रति औंस 1,839.45 डॉलर होता. तर चांदीचा भाव 0.56 टक्के वाढीसह म्हणजेत 0.14 डॉलरची वाढ होऊन 25.29 डॉलर प्रति औंस एवढा राहिला.
मुंबईतील सोने चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 47800 रुपये
24 कॅरेट सोने : 48,800 रुपये
चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)
पुणे सोने चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 47, 800 रुपये
24 कॅरेट सोने : 48, 800 रुपये
चांदीचे दर : 65900 रुपये (प्रतिकिलो)
नाशिक सोने चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 47800 रुपये
24 कॅरेट सोने : 48,800 रुपये
चांदीचे दर : 66000 रुपये (प्रतिकिलो)
नागपूर सोने चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 47, 800 रुपये
24 कॅरेट सोने : 48, 800 रुपये
चांदीचे दर : 66000 रुपये (प्रतिकिलो)
सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता
देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. यंदाच्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक कयास बांधला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.


