मेष : स्पर्धेत बक्षीस मिळेल. आनंदी वृत्तीने वागाल. बौद्धिक तरलता दिसून येईल. अभ्यासूपणे निर्णय घ्याल. जुगाराची आवड पूर्ण कराल.
वृषभ : आपल्याच मतावर ठाम राहाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. मनातील गैरसमज बाजूस सारावेत. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कमिशनच्या कामात लक्ष घालाल.
मिथुन : जोडीदाराचे म्हणणे जाणून घ्यावे. जवळचा प्रवास सुखकारक होईल. उगाच नसत्या गोष्टी उकरून काढू नका. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्याल. विविध विषयात रुची दाखवाल.
कर्क : बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. कौटुंबिक दिमाख दाखवाल. हातातील कामाकडे लक्ष द्यावे. अचानक झालेले बदल स्वीकारावेत. भावंडांना मदत करावी.
सिंह : इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे लक्ष द्यावे. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.
कन्या : मनातील नसत्या चिंता बाजूस साराव्यात. द्विधा मन:स्थितीतून बाहेर यावे. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.
तूळ : मनातील इच्छा पूर्ण होतील. दिवस आळसात घालवाल. मनात मोठमोठ्या कल्पना रचल्या जातील. भावंडांशी मतभेद संभवतात. स्त्री समूहात वावराल.
वृश्चिक : सामाजिक वजन वाढेल. घरासाठी नवीन काहीतरी खरेदी केले जाईल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न कराल. पराक्रमाला वाव मिळेल.
धनू : अतातायीपणे निर्णय घेऊ नका. धार्मिक कार्यात सहभाग नोंदवाल. धर्मादाय संस्थेस मदत कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
मकर : अतिविचार करू नका. कामे वेळेत पूर्ण करण्यास भर द्या. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. चिकाटी सोडून चालणार नाही. अचानक धनलाभ संभवतो.
कुंभ : बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. जोडीदाराच्या सहकार्याने कामे पार पडतील मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. कामात चंचलता आणू नका. काही गोष्टी काटेकोरपणे कराव्यात.
मीन : इतरांच्या आनंदात आनंद मानाल. सर्वांना गोड बोलून आपलेसे करावे. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. प्रवासात त्रास संभवतो