जळगाव- महाराष्ट्र राज्यातील कोचिंग क्लास चालकांना कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या अटी-शर्तीवर कोचिंग क्लास सुरु करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा एक दिवशीय आंदोलन करण्याचा इशारा कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे जिल्हाध्यक्ष पंकज नाले यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
राज्यातील सर्व कोचिंग क्लासेस संचालक, खाजगी शिक्षक प्रचंड आर्थिक विवंचनेत असल्याने राज्य सरकारने सोशल डिस्टंशिंगचे काटेकोर पालन करण्याच्या अटीवर खाजगी कोचिंग क्लासेस १ नोव्हेबर २०२० पूर्वी सुरू करण्यास परवानगी दयावी अन्यथा केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सोशल डिस्टेन्शसिंग सॅनिटायझर,ऑक्सिमीटर, थर्मोमीटर, मास्क व पालकांचे समंतीपत्र घेऊन, नियमावली तयार करून सीसीएचे सभासद संचाলक संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी कोचिंग क्लासेस सुरू करतील.
एकाही संचालकांवर कार्यवाही झाल्यास सीसीएचे राज्याध्यक्ष प्रा. पाइुरग माइकीकर याची आत्मदहनाचा इशारा दिला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळात राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खाजगी शिक्षकांचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
निवेदनांवर कोचिंग क्लास असोसिएशनचे उपजिल्हाध्यक्ष प्रतिभा पाटील , किरण बारी,सुखदेव पाटील एडवोकेट दाभाडे, आर. सी. पाटील, शिरीष पाटील, दिशा स्पर्धा परीक्षेचे संचालक वासुदेव पाटील उपस्थित होते.