मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी अखेर काल राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला, त्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. याच पाश्र्वभूमीवर माध्यमांशी बोलतांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही खडसेंचं महाविकास आघाडीत स्वागत केलंय.
राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, एकनाथराव खडसेंच्या जाण्यानं भाजपचं मोठं नुकसान झालं आहे. खरं तर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही.
राष्ट्रवादीला एकनाथ खडसे भेटल्यामुळे चांगले दिवस येतील, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय. भाजप सोडता फडणवीस यांच्या वागणुकीमुळे असं करावं लागत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली तसेच एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत.