Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जो बायडेन यांनी भारतीयांना दिली खूशखबर; H1B व्हिसाबद्दल मोठा निर्णय

by Divya Jalgaon Team
January 27, 2021
in राष्ट्रीय
0
जो बायडेन यांनी भारतीयांना दिली खूशखबर; H1B व्हिसाबद्दल मोठा निर्णय

न्यूयॉर्क : राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) काम करायला सुरुवात केली आहे. जो बायडन यांनी आपल्या प्रशासनात अनेक भारतीय लोकांचा (indian people) समावेश केल्यानंतर त्यांनी आता आणखी एक खुशखबरी दिली आहे. बायडेन प्रशासनाने आता H1B व्हिसा (H1B visa) धारकांच्या H-4 व्हिसा असणाऱ्या पार्टनरला (Life partner) अमेरिकेमध्ये काम सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे असंख्य भारतीयांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या 4 वर्षात अमेरिकेत राहणाऱ्या अशा जोडप्यांना त्यांचं भविष्यात काय होणार याची मोठी चिंता लागली होती. बायडेन प्रशासनाच्या नवीन आदेशामुळे आता अमेरिकेत स्थलांतर केलेल्या भारतींना दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barak Obama) यांच्या काळात H1B व्हिसाधारकांच्या पत्नींना अमेरिकेत काम करण्यासंबंधित आदेश पारित करण्यात आला होता. पण माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) सत्तेवर आल्यानंतर त्यांनी व्हिसा धोरणात अनेक बदल केले होते.

बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे आता H-4 व्हिसावर काम करणाऱ्य लोकांनी सुटकेचा निः श्वास घेतला आहे. बायडेन यांच्या या निर्णयाबद्दल एका महिलेनं आनंद व्यक्त केला आहे. तिने म्हटलं की भविष्यातील पुढील रस्ता तिच्यासाठी सुलभ झाला आहे. शर्मिष्ठा महापात्रा नावाच्या एका वापरकर्तीने लिहिलं की, ‘H-4 व्हिसा धारकांसाठी आजचा दिवस मोठा आहे. माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी हा व्हिसा प्रकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी याला परवानगी दिली आहे.

कोणत्याही देशाच्या तुलनेत अमेरिकेला जाणाऱ्या भारतीय लोकांची संख्या आधिक आहे. अमेरिकेत कोट्यावधी भारतीय वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्याही खूप आहे. त्यामुळे बायडेन प्रशासनाच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे.

Share post
Tags: #Jo BidenMarathi NewsNew Yorkजो बायडेन यांनी भारतीयांना दिली खूशखबर; H1B व्हिसाबद्दल मोठा निर्णय
Previous Post

FAU-G चा धडाका! अवघ्या २४ तासांत १० लाखांवर डाऊनलोड्स

Next Post

देशात सर्वाधिक डिजिटल साताबाऱ्याचा वापर महाराष्ट्रात

Next Post
जो बायडेन यांनी भारतीयांना दिली खूशखबर; H1B व्हिसाबद्दल मोठा निर्णय

देशात सर्वाधिक डिजिटल साताबाऱ्याचा वापर महाराष्ट्रात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group