Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

FAU-G चा धडाका! अवघ्या २४ तासांत १० लाखांवर डाऊनलोड्स

by Divya Jalgaon Team
January 27, 2021
in तंत्रज्ञान, राज्य
0
FAU-G चा धडाका! अवघ्या २४ तासांत १० लाखांवर डाऊनलोड्स

मुंबई – गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बहुचर्चित FAU-G हा गेम भारतात लॉन्च करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी लॉन्च करण्यात आलेला हा गेम आता गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे लॉन्च होताच या गेमने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अवघ्या २४ तासांत गुगल प्ले स्टोरवरून तब्बल १० लाख जणांनी हा गेम डाऊनलोड केला आहे.

भारतात PUBG गेमवर बंदी घातल्यानंतर FAU-G गेमची घोषणा करण्यात आली होती. युझर्समध्ये या गेमबाबत मोठी क्रेझ होती. FAU-G गेमची ही क्रेझ लाँचिंगनंतर समोर आलेल्या डाऊनलोड्सच्या आकडेवारीवरुन पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. nCore गेमिंग नावाच्या एका भारतीय कंपनीने हा गेम डेव्हलप केला असून अभिनेता अक्षय कुमार गेमला प्रमोट करत आहे.

सध्या FAU-G एकाच मोडवर

आताच्या घडीला हा गेम केवळ एकाच मोडवर खेळता येणार आहे. संपूर्ण गेमचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल. आता या गेममध्ये कॅम्पेन मोड उपलब्ध आहे. या मोडमध्ये भारतीय सैन्यदलाचा एक अधिकारी त्याच्या टीमपासून वेगळा झाला आहे आणि त्याला शोधण्यासाठी बाकीचे अधिकारी आणि जवान मिशनवर जाणार आहेत.

iOS अद्याप उपलब्ध नाही

तुमच्या स्मार्टफोनवर हा गेम खेळायचा असेल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये किमान ४६० एमबी स्पेस असायला हवी. तसेच तुम्हांला या गेमच्या सर्व्हरमध्ये साईन इन करण्यासाठी मोबाइल किंवा वायफाय कनेक्शन/नेटवर्कची आवश्यकता भासेल. FAU-G हा गेम केवळ गुगल प्ले स्टोरवरच उपलब्ध आहे. त्यामुळे iOS युझर्सना या गेमसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. iOS युझर्ससाठी हा गेम उपलब्ध होणार आहे किंवा नाही किंवा तो कधी उपलब्ध होईल, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

Fight for your country. Protect our flag. Action game FAU-G takes you to the frontlines and beyond! Start your mission today. Jai Hind!

Download now: https://t.co/4TXd1F7g7J#HappyRepublicDay #FAUG #atmanirbharbharat@vishalgondal @akshaykumar @dayanidhimg @BharatKeVeer pic.twitter.com/8HA6ZilIsg

— nCORE Games (@nCore_games) January 26, 2021

Share post
Tags: Fau-GFAU-G चा धडाका! अवघ्या २४ तासांत १० लाखांवर डाऊनलोड्सGameMumbai NewsTechnology
Previous Post

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावे म्हणून प्रजासत्ताकदिनी आय टक चे आंदोलन यशस्वी

Next Post

जो बायडेन यांनी भारतीयांना दिली खूशखबर; H1B व्हिसाबद्दल मोठा निर्णय

Next Post
जो बायडेन यांनी भारतीयांना दिली खूशखबर; H1B व्हिसाबद्दल मोठा निर्णय

जो बायडेन यांनी भारतीयांना दिली खूशखबर; H1B व्हिसाबद्दल मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group