जळगाव – महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविका यांना १लाख रु मदतनिसांी ७५०००/₹ थकीत सेवानिवृत्ती लाभ त्वरित द्यावा..या सेवानिवृत्त यांना श्रावण बाळ योजनेमध्ये समावेश करावा ..किमान पाच हजार रुपये पेन्शन द्यावी यासाठी जळगाव येथे काल रोजी कलेक्टर कचेरीवर जेलभरो आंदोलन ठेवले होते पण प्ले म्हणणे महाराष्ट्र शासनाकडे ताबडतोब पाठवतो जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करतो असे पोलिसांनी सांगितल्याने जेलभरो तर खूप करून उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्ष अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वात समोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
त्या आंदोलनाला.. विजया बोरसे व वैशाली पाटील धानवड तालुका जळगाव अशोक सपकाळे यांचेसह अनुसया ताई घोंगडे शशिकला निंबाळकर,, अडा व द पुष्पा सोळंके राजू बाई सुर्यवंशी चिंचोली /आडगाव तालुका यावल..नीमझिरी त अमळनेर च्या श्रीमती अंजना माधवराव पाटील राजुबई सुर्यवंशी पाटील असे एकूण दहा प्रतिनिधी हजर होते . अंगणवाडी सेविकांना उत्पन्नाचा दाखला मिळाल्यास श्रावणबाळ योजनेचे लाभ मिळू शकतो लाभ देऊ असे आश्वासन उपजिल्हाधिकारी यांनी दिले दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी महिला बालकल्याण खात्याचे मंत्री यशोमती ठाकूर यांचेकडे तातडीने पाठपुरावा केल्याचे ई-मेल मेसेज आलेने ..सेवानिवृत्त सेविका मदतनिसांना लाभाच्या रक्कमा ताबडतोब मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे..असे युनियनच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे


