जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 1 डिसेंबर, 2020 च्या अधिसुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सन 2021 या कॅलेंडर वर्षासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन विभाग वगळून) तीन सुट्ट्या जाहिर केल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी अक्षय्य तृतीया शुक्रवार, दिनांक 14 मे, 2021, आषाढी एकादशी मंगळवार, दिनांक 20 जुलै, 2021 व घटस्थापना गुरुवार, दिनांक 7 ऑक्टोबर, 2021 याप्रमाणे एकूण तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.
तरी सर्व शासकीय आस्थापनांनी याची नोद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.